Posts

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये विविध उपक्रम

Image
लोणावळा, संपादक : संजय पालवे विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.      जयंतीनिमित्त प्रशालेत स्वच्छता रॅली, शालेय परिसर स्वच्छता, स्वच्छता जनजागृती तसेच ‘स्वच्छ व सुंदर भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.      स्वच्छता रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेविषयक फलक घेऊन घोषणाबाजी केली. तसेच नागरिकांना आपल्या परिसराची स्वच्छता राखण्याचे आवाहन करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली.      प्रशालेतील प्रकाश हॉलमध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी असे दोन गट करण्यात आले होते. पहिल्या गटात वेदांत वाघिरे, समृद्धी जरदाळे आणि कस्तुरी कालेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृती...

सिक्युरिटी गार्डच्या पगारवाढीचा सात महिन्यांचा लढा यशस्वी

Image
संपादक, संजय पालवे        गेल्या सात महिन्यांपासून सिक्युरिटी गार्ड यांच्या पगारवाढीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे सिक्युरिटी गार्डच्या पगारवाढीचा प्रश्न मार्गी लागला असून, या यशामुळे सिक्युरिटी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.        या लढ्यात श्री. संदीप गायकवाड यांनी विशेष प्रयत्न करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच कापूरवाडी गावचे सरपंच श्री. सचिन शेठ दुसुंगे, मेहेकरी गावचे उपसरपंच श्री. संभाजी पालवे आणि अॅड. श्रीमती मीनाक्षी सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.       सिक्युरिटी गार्डच्या पगारवाढीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे सिक्युरिटी बांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या लढ्याला मिळालेले यश हे सर्वांच्या एकजुटीचे आणि प्रयत्नांचे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्राचार्य प्रज्ञा शुक्ल यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने गौरव

Image
लोणावळा, संपादक : संजय पालवे      ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने लोणावळा परिसरातील शाळांमधील मुख्याध्यापकांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.       यंदा लोणावळा परिसरातील चार मुख्याध्यापकांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय, लोणावळा येथील प्राचार्य श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांचा समावेश आहे.      लोणावळा येथील हॉटेल चंद्रलोक येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी श्रीमती विद्या वकारे (झोन चेअरमन), श्री. यश सोनवणे (अध्यक्ष), ॲड. श्री. राजेश देसाई (खजिनदार), श्री. सुमित बदेशिया (सचिव) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.     प्राचार्य श्रीमती प्रज्ञा शुक्ल या विद्यार्थ्यांप्रती समर्पित शिक्षिका असून प्रशालेची प्रशासकीय जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. विविध प्रशासकीय आव्हानांचा सामना करताना कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकांना सोबत घेऊन त्या प्रशालेचे कामकाज प्रभावी...

महात्मा गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची स्वच्छता जनजागृती रॅली

Image
लोणावळा, संपादक : संजय पालवे       विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन केले.   रॅलीमध्ये प्रशालेतील सुमारे ७० ते ८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेविषयक संदेश असलेले फलक घेऊन रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी तसेच परिसरातील रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली.      स्वच्छता रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसोबत रेल्वे स्टेशनवरील अधिकारी व कर्मचारी, लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले.      रॅलीदरम्यान विद्यार्थी, कर्मचारी आणि प्रवाशांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन केले.      स्वच्छता जनजागृती रॅलीचे नियोजन प्रशालेच्या प्...

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये गणेशोत्सव सोहळ्याची उत्साहात सांगता

Image
लोणावळा, संपादक : संजय पालवे      विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द. पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सहा ते सात दिवस उत्साहात साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सव सोहळ्याची सांगता आज महाआरती व गणेश विसर्जन मिरवणुकीने झाली.      गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशीच्या महाआरतीचे मानकरी नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर आणि श्रीमती संजीवनीताई आंबेकर होते. यावेळी शाळा समिती सदस्य श्री. धीरूभाई कल्याणजी आणि श्री. राजेशजी मेहता यांचीही प्रमुख उपस्थिती होती.      गणेशोत्सवानिमित्त प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा आदी उपक्रमांचा समावेश होता. सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.     गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल पथक, झांज पथक, बर्ची पथक तसेच लेझीम पथकाने सहभाग घेतला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात विसर...

गणेशोत्सवानिमित्त गीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादलोणावळा

Image
लोणावळा, संपादक: संजय पालवे         विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त संगीत विभागाच्या वतीने गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.    स्पर्धेत वैयक्तिक तसेच सामूहिक गीतांचा समावेश होता. सुमारे ३० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव तसेच गणरायावर आधारित विविध गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.       संगीत विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे यांनी प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले. स्पर्धेदरम्यान प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित राहून त्यांचे कौतुक केले. यावेळी प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांनीही एका गीताचे सादरीकरण केले. शिक्षक प्रतिनिधी श्री. कल्याण चौगुले यांचीही कार्यक्...

व्ही.पी.एस मधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अद्ययावत व्यायामशाळेची सुविधा

Image
लोणावळा, संपादक : संजय पालवे,      विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सतलज जल विद्युत निगम (SJVN) फाउंडेशन ग्रुपच्या वतीने देण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन आज नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे आणि फाउंडेशन ग्रुपच्या प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले.       SJVN फाउंडेशन ग्रुपचे श्री. रॉबिन कुमार झा आणि श्री. आयुष सिंग यांच्या प्रयत्नांतून प्रशालेला विद्यार्थ्यांसाठी ही व्यायामशाळा उपलब्ध झाली आहे.      उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे होत्या. यावेळी मंचावर नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, नियामक मंडळ सदस्य श्री. प्रमोद कुदळे, श्रीमती साधना कुदळे, श्री. यतीश कुमार गर्ग, श्री. अमन पासवान, श्री. पुष्पेंद्र कुमार राजपूत( SJNV प्रतिनिधी), शाळा समिती सदस्य श्री. धीरूभाई कल्याणजी, श्री. राजेशजी मेहता, प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ला, उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर...