व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये इंद्रायणी कॉलेजचे वर्चस्व

तळेगाव दाभाडे, ४ डिसेंबर
(संपादक: संजय पालवे)
       आज इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि उपविजेतेचा मान  व्ही.पी.एस हायस्कूल संघाला मिळाला.
         अंतिम सामना बी.एम.के प्रॉपर्टीज चे संग्राम काकडे यांच्या हस्ते टॉस करून खेळवण्यात आला. संग्राम काकडे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत खेळाडू वृत्तीने खेळण्याचा सल्ला दिला. संग्राम काकडे स्वतः हॉलीबॉल खेळाडू असल्यामुळे त्यांनी सामन्याचा चांगलाच आनंद घेतला.
     दोन्ही संघातील खेळाडू अतिशय सुंदर असा खेळ करत एक-एक हाफ दोन्ही संघाने बरोबरीत घेतल्यानंतर तिसरा हाफ निर्णय होता. निर्णय हाफ मध्ये इंद्रायणी महाविद्यालयातील खेळाडूंनी पहिल्यापासून सामन्यावरती अचूक पकड राखत विजय संपादन केला.
     स्पर्धेच्या शेवटी बक्षीस वितरण संग्राम काकडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व व्ही.पी.एस हायस्कूलचे उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आले.