Posts

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पाच हजार पणत्यांच्या प्रकाशात दीपोत्सव उत्साहात साजरा

Image
लोणावळा, संपादक : संजय पालवे       विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द. पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दीपावलीनिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून प्रज्वलित केलेल्या जवळपास पाच हजार पणत्यांच्या प्रकाशाने संपूर्ण शाळेचा परिसर उजळून निघाला. दीपोत्सवाच्या या नेत्रदीपक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले.           कार्यक्रमासाठी नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समितीचे अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, श्री. अरविंदजी मेहता (मराठी प्राथमिक विद्यालय शाळा समिती अध्यक्ष) , नियामक मंडळ सदस्य ॲड. संदीप अगरवाल, श्री. धीरूभाई कल्याणजी आणि श्री. राजेशजी मेहता हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.       उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल, उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, प्रा...

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये खंडेनवमी उत्साहात साजरी

Image
लोणावळा, संपादक: संजय पालवे  विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.            यानिमित्ताने प्रशालेतील कार्यालय, ग्रंथालय, प्रयोगशाळा तसेच क्रीडा विभागातील साहित्याचे पूजन प्राचार्य, पदाधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी विद्यार्थ्यांना खंडे नवमीचे आणि आपट्याच्या पानाचे महत्त्व समजावन सांगितले       दीपावली उत्सवाचे औचित्य साधून प्रशालेच्या चित्रकला विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील निर्मिती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. चित्रकला विभागातील श्री. महेश चोणगे, श्री. योगेश कोठावदे व श्री. विक्रम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे आणि वेगवेगळ्या आकारांचे आकर्षक आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांच्या कलात्मक कल्पकतेतून साकारलेल्या या आकाशकंदिलांचे प्रदर्शन प्रशालेत भरविण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.    ...

मनशक्ती केंद्रातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Image
लोणावळा, संपादक संजय पालवे : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मनशक्ती केंद्राच्या वतीने उद्बोधनपर व मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.         प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मनशक्ती केंद्रातील सहा साधकांनी प्रशालेला भेट देऊन इयत्ता दहावीच्या विविध वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मनाची एकाग्रता कशी वाढवावी, परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन कसे करावे, तसेच अभ्यास अधिक प्रभावी होण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा, याविषयी साधकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आई-वडील आणि गुरूजनांप्रती कृतज्ञतेची भावना कशी व्यक्त करावी, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. यासाठी एक सोपी व अर्थपूर्ण प्रार्थनाही विद्यार्थ्यांना शिकविण्यात आली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी सकार...

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये जागतिक हात धुवा दिवस साजरा

Image
लोणावळा, संपादक : संजय पालवे        विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द. पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्काऊट आणि गाईड विभागाच्या वतीने जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.             आजच्या काळात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी नियमितपणे आणि योग्य पद्धतीने हात धुण्याची सवय लावून घेतल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.      यावेळी स्काऊट आणि गाईड विभाग प्रमुख श्री. संजय पालवे यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे फायदे सांगितले. तसेच विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेला विशेष महत्त्व असून,...

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

Image
लोणावळा, संपादक :संजय पालवे        विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि प्रेरणादायी विचारवंत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.      वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील प्रकाश हॉलमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच, प्रत्येक वर्गात वर्गशिक्षकांनी आपल्या तासिकेदरम्यान विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केले आणि वाचनाचे महत्त्व पटवून दिले.  मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे वाचनाची गोडी कमी होण्याची चिंता  आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे.            मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे वाचनाकडे होणारे दुर्लक्ष ही चिंतेची बाब बनली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांची वाचनसंस्कृती विकसित व्हावी आणि ...

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

Image
लोणावळा, संपादक : संजय पालवे      विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सांस्कृतिक विभागाच्या वतीने दोन सत्रांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.          सकाळच्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षिकांसाठी तर दुपारच्या सत्रात हायस्कूलमधील विद्यार्थिनी व शिक्षिकांसाठी महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गजाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल, उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. वैभव सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी श्री. कल्याण चौगुले आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री. सिताराम घारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.      विद्यालयाच्या मैदानावर गोलाकार रचना करून व...

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

Image
लोणावळा, संपादक : संजय पालवे       विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द. पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रशालेच्या ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.      विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना ग्रंथांचे महत्त्व समजावे तसेच ग्रंथालयाची ओळख व्हावी, या उद्देशाने ग्रंथालय विभागप्रमुख श्रीमती दीपाली गायखे यांनी प्रदर्शनाचे नियोजन केले.      शासनाने इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केलेला ग्रंथालय हा विषय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रंथालयाला भेट देऊन अधिक चांगल्या प्रकारे समजावा, या हेतूने प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.      ग्रंथालय विभागप्रमुख श्रीमती दीपाली गायखे यांनी निवडक व उपयुक्त ग्रंथांचे प्रदर्शन भरविले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी ...