अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द. पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रशालेच्या ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
     विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना ग्रंथांचे महत्त्व समजावे तसेच ग्रंथालयाची ओळख व्हावी, या उद्देशाने ग्रंथालय विभागप्रमुख श्रीमती दीपाली गायखे यांनी प्रदर्शनाचे नियोजन केले.
     शासनाने इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केलेला ग्रंथालय हा विषय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रंथालयाला भेट देऊन अधिक चांगल्या प्रकारे समजावा, या हेतूने प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
     ग्रंथालय विभागप्रमुख श्रीमती दीपाली गायखे यांनी निवडक व उपयुक्त ग्रंथांचे प्रदर्शन भरविले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी उत्कृष्ट नियोजन केले. इयत्ता सहावीतील सर्व विद्यार्थ्यांना रांगेने ग्रंथालयात नेऊन विविध ग्रंथांची माहिती देण्यात आली.
     यावेळी पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे महत्त्व समजावून सांगितले. जीवन घडविण्यामध्ये वाचन आणि ग्रंथालयाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
      प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर आणि पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये उपस्थित होते. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास तसेच ग्रंथालयाविषयी अधिक माहिती मिळण्यास मदत होईल.
     उपक्रमासाठी श्री. योगेश कोठावदे, श्री .संजय पालवे, श्री. सुभाष क्षीरसागर आणि श्री. गणेश घारे यांनी सहकार्य केले.
    नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री .भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी आणि ग्रंथालय प्रमुखाचे कौतुक केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा