व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी
लोणावळा, संपादक:संजय पालवे
Digital news
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकाश हॉल मध्ये दीप अमावस्या साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल होत्या. मंचावर उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्री.कल्याण चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.वैभव सूर्यवंशी आणि ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.
दीप अमावस्या निमित्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या प्रकारची दिवे आणली होती. त्यामध्ये मातीची दिवे, पिठापासून तयार केलेली दिवे, नारळाच्या कवटी पासून बनवलेले दिवे, कागदी दिवे आणि घरामधील पारंपारिक दिव्यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी आणलेल्या दिव्यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी प्रशालेच्या मंचावर ठेवण्यात आले होते. प्रकाश हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये कु.पूनम गलधर, कु.अदिती पवार, कु.दर्शना पालकर, कु.श्रावणी जाधव, कु.अनुराधा गलधर विद्यार्थ्यांनी मनोगत सादर केले.
शिक्षक मनोगता मधून श्रीमती वैशाली ढाकणे आणि श्री सोमनाथ ढुमणे यांनी दीप अमावस्येचे महत्त्व सांगितले. प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी विद्यार्थ्यांकडून स्तोत्र पठण करून घेतले आणि अमावस्याचे महत्व सांगितले.
प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना दीप अमावस्या निमित्त माहिती सांगत घरामधील दिव्याचे काय महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे यांच्या सुंदर अशा गायनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. वैभव सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती सई सर्जेराव यांनी तर आभार श्रीमती स्वाती व्हरांबळे यांनी मानले.
प्रशालेच कलाशिक्षक श्री.महेश चोणगे यांनी सुंदर फलक लेखन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. संजय पालवे, श्री. वैभव काब्दे, श्री.श्रीकांत म्हसकर तसेच सेवक श्री.मुकुंद जगताप आणि श्री.सचिन गवळी यांनी मदत केली.
प्रसंगी सभागृहामध्ये ज्येष्ठ शिक्षक श्री.हरिभाऊ कुलकर्णी, श्री.देविदास खेडकर आणि श्री.योगेश कोठावदे उपस्थित होते.
विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना दीप अमावस्या निमित्त शुभेच्छा दिल्या.