व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
Digital News 
    विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
     स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशभर उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशालेच्या प्रांगणामध्ये संचलन, समूहगीते आणि देशभक्तीपर गीते यांचे आयोजन करण्यात आले.
     ध्वजारोहणासाठी मंचावर नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, प्राचार्य श्रीमती प्रज्ञा शुक्ल, उपमुख्याध्यापक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, बी.सी.एस कॉलेजचे प्राचार्य चंद्रशेखर भगत, पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, मराठी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नरके मॅडम, इंग्लिश माध्यमाचे मुख्याध्यापक श्री.अनिकेत रासकर शिक्षक प्रतिनिधी श्री.कल्याण चौगुले, श्रीमती स्नेहलता कांबळे, प्रशालेचे ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, व्ही.पी एस मॉन्टेसरी मुख्याध्यापिका श्रीमती अन्नपूर्णा सूर्यवंशी, व्ही.पी.एस. कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या श्रीमती सविता सिंग, श्री.रवी पडवळ आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सीताराम घारे उपस्थितं होते.
      ध्वजारोहणाचा मान सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या श्रीमती स्नेहलता कांबळे आणि श्री.चंद्रशेखर भगत यांना मिळाला. श्रीमती स्नेहलता कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. 
     कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी आपल्या भाषणांमधून आपल्या देशाची संस्कृती जगामध्ये कशाप्रकारे श्रेष्ठ आहे हे सांगितले. श्री.संजय पालवे, श्रीमती वैशाली तारु आणि श्री.ज्ञानेश्वर बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली धो-धो कोसळणाऱ्या पावसामध्ये देखील स्काऊट, गाईड, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संचालन केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली तारु आणि श्रीमती रेवती बोके, प्रास्ताविक प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांनी केले. कला शिक्षक श्री.महेश चोणगे, श्री.योगेश कोठावदे आणि श्री.विक्रम शिंदे यांनी सुंदर फलकलेखन केले. संगीत शिक्षक श्री.धनंजय काळे यांनी विद्यार्थांचे समूह गीतांची छान तयारी करून घेतली.
    नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी आणि सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
   

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव