विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरी करण्यात आली.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून सकाळ सत्र आणि दुपार सत्रामध्ये साजरी करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक बनण्याची आणि अध्यापन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
मागील वर्षी इयत्ता नववी मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक होण्याची संधी देण्यात येते. यावर्षी कु.सानवी आंबेकर या विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाची संधी देण्यात आली. चि.राजकुमार पाटील, कु.श्वेता भदरगे, कु.दळवी, कु.चेतना रावळ यांनी उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सेवकांच्या भूमिका उत्तम पार पाडल्या.
अध्यापन कार्य संपल्यानंतर सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांचा एकत्रित कार्यक्रम प्रशालेच्य प्रकाश हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात श्री.धनंजय काळे यांच्या गीताने झाली. ज्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य केले तसेच मुख्याध्यापक आणि इतर पदाधिकारी म्हणून कार्य केले अशा विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव सांगितले आणि अध्यापनाचे कार्य किंवा प्राचार्य म्हणून पार पाडण्याची जबाबदारी किती कठीण आहे हे विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवा मधून सांगितले. कु.नंदिनी प्रजापती, तनिष्का मांजरे, कु.आहेर, कु. मौर्या यांनी आपली मनोगते सादर केली.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात आणि ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. लेखणी देऊन विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक यांचा सन्मान पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रशालेचे प्राचार्य श्री सुहास विसाळ यांनी विद्यार्थी शिक्षकांचे आणि एक दिवस बनलेल्या मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ आणि श्रीमती स्वाती व्हरांबळे यांनी आपली मनोगते सादर केली. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे, श्री.योगेश कोठावदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे यांनी तर आभार श्री.धनंजय काळे यांनी मानले. विद्यार्थी शिक्षकांसाठी वेळापत्रक श्री.वैभव सूर्यवंशी यांनी तयार केले तसेच श्री महेश चोनगे, श्री.मुकुंद शिंदे, श्री.सुभाष क्षीरसागर, श्री.संकेत कवडे, श्री.श्रीकांत म्हसकर यांनी मदत केली. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व सेवकांचे सहकार्य लाभले
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.
मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक वृंदांना शुभेच्छा दिल्या.