व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये जागतिक हात धुवा दिवस साजरा

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
      विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द. पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्काऊट आणि गाईड विभागाच्या वतीने जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
           आजच्या काळात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी नियमितपणे आणि योग्य पद्धतीने हात धुण्याची सवय लावून घेतल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
     यावेळी स्काऊट आणि गाईड विभाग प्रमुख श्री. संजय पालवे यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे फायदे सांगितले. तसेच विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेला विशेष महत्त्व असून, दूषित हातांमुळे जंतू शरीरात प्रवेश करून विविध आजार होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी श्री. पालवे यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले आणि योग्य पद्धतीने हात धुण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
      कार्यक्रमाला प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षक श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, स्काऊट आणि गाईड शिक्षक श्रीमती वैशाली तारू आणि श्री. ज्ञानेश्वर बुरांडे उपस्थित होते.
      उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजले आणि आरोग्याच्या दृष्टीने हात स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा