स्काऊटर गाईडर उजळणी व नोंदणी कार्यशाळा संपन्न
लोणावळा, संपादक : संजय पालवे
पुणे भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था आयोजित एकदिवशीय अभ्यासक्रम उजळणी व पथक नोंदणी कार्यशाळा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय कान्हे येथे सोमवार १७ जुलै रोजी संपन्न झाली.
मावळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा. सुदाम वाळुंज यांचे अधिपत्य व मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती तालुकास्तरीय या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सत्तर शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेत स्काऊट गाईड अभ्यासक्रम, मूल्यमापन, प्रशिक्षणे, शिबीरे, मेळावे व वर्षभरातील उपक्रम याबाबत उजळणी व नियोजन करण्यात आले.
पुणे भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था संघटन आयुक्त मा. श्री. दिगंबर कारंडे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त शमा शिकलगार, ट्रेनिंग कौन्सेलर विजय जोरी, अनिल कळसकर व सुजाता तारळकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रसंगी कान्हे केंद्राचे प्रमुख श्री. नवले, काले केंद्राचे प्रमुख श्री. डेंगळे, शाळेचे मुख्याध्यापक, श्री. कदमबांडे, सहशिक्षक श्री. लोटे, श्रीमती जाधव उपस्थित होते. तसेच या प्रशिक्षणाच्या समन्वयक श्रीमती बिलकिस अन्सारी यांनी प्रस्तावना करीत सर्वांना शुभेच्छा दिल्या व स्काऊटर श्री. सकपाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.