लाडक्या बाप्पांचे विसर्जन

लोणावळा, संपादक : संजय पालवे,
       विद्या प्रसारिणी सभेचे श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री विद्या बालक मंदिर भाजे- मळवली यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रशालेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणरायाची अर्थात लाडक्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक शालेय परिसरात ढोल ताशांच्या गजरकाढण्यात आली.   
    विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे मॅडम, संस्थेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी सर, सहकार्यवाह श्री विजय भुरके सर, शाला समितीचे सदस्य श्री उस्मान इनामदार, श्री भगवान आंबेकर व श्री प्रमोद कुदळे या सर्वांच्या प्रेरणेने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 
      श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयाची स्थापना श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 6 सप्टेंबर,1991 रोजी झाली होती. शाळेचे 33व्या वर्षात पदार्पण होत आहे व संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे. आज प्रशालेमध्ये गणपती बाप्पांचे पूजन श्री विद्या बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रगडे यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच बाप्पांची आरती  प्रशालेचे प्राचार्य श्री संतोष पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आली. याप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.मकरंद गुर्जर यांनी नियोजन केले. कलाशिक्षक श्री.धुळाजी देवकाते, श्री.विजय कवडे यांनी सुंदर सजावट व फलक लेखन केले. श्री संभाजी तुपे, श्री गहिनीनाथ बारगजे, सौ. कविता गायकवाड, श्री. बाळासाहेब कोकणे यांनी प्रसाद वाटपाचे नियोजन केले. शिक्षक प्रतिनिधी श्री. देवीदास खेडकर, श्री.बाळू शिरसाट, सौ. सुरेखा आहिरे, श्री राजेंद्र होले, सौ ललिता पवार, श्री. गणेश गायकवाड, श्री. जालिंदर बनकर, श्री.मनोहर भोसले, श्री.श्रीराम तांदळे, सौ.मनीषा जगताप, श्रीमती.अंजली आंबेकर, सौ.अश्विनी हुलावळे, साक्षी आंबेकर, काजल रणदिवे, सीमा सिंग, शिल्पा आंबेकर, अनुजा वाघमारे, सुषमा येवले आदी शिक्षक उपस्थित होते.
      सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.रोहिदास डिकोळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.जगन्नाथ दोरकर, श्री.मुकुंद भोसले, श्री. हनुमंत इंगवले, श्री.नामदेव कडू यांनी परिश्रम घेतले. विसर्जन कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाप्पांच्या जय घोषणेने व ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यात आला. प्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली