व्ही.पी.एस मध्ये शिक्षक दिन साजरा...

लोणावळा,संपादक :संजय पालवे       
 https://youtu.be/95UCqpuVQc0?si=gMzVWh6TNz2iHakq       
    विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
   इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या दिवशी शिक्षकांच्या भूमिकेमध्ये असतात. मागील वर्षी इयत्ता नववी मधील प्रथम पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकाचे कार्य पार पाडण्याची संधी दिली जाते.
     यावर्षीच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने कु.वेदिका राठोड(मुख्याध्यापक), कु.काव्यांजली पांडव (उपमुख्याध्यापक) तर पर्यवेक्षक चि.कृष्णा तांगडे, चि.महेश मुंगडे, कु.श्रावणी ठोंबरे आणि शिक्षक प्रतिनिधी कु.निशा वर्मा यांनी आपापल्या भूमिका चोख पार पाडल्या.
    जवळपास 110 विद्यार्थी शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. काही विद्यार्थीनी सेवकाची भूमिका सांभाळली आणि पाच विद्यार्थी पदाधिकाऱ्यांच्या भूमिकांमध्ये होते.
    विद्यार्थ्यांनी अध्यापन करण्या आधी वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांकडुन पुस्तके घेऊन अभ्यासक्रमाची माहिती घेतली आणि छान तयारी करून आपल्याला दिलेला विषय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडला. 
     अध्यापनाचे कार्य संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये एकत्र जमून त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना अध्यापन करताना आलेले अनुभव आणि गमती-जमती सांगितल्या तसेच शिक्षकांना दैनंदिन अध्यापन करताना वर्गामध्ये येणाऱ्या अडी-अडचणीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. 
    विद्यार्थी शिक्षक कौतुक समारंभ प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री.सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर उपस्थित होते. 
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि. कौस्तुभ पवार आणि कु. तनिष्का गायकवाड यांनी केले. प्रास्तविक कु. दीप्ती ओझरकर, ईशस्तवन‌ आणि भक्ती गीत चि. गौरव गोणते तर आभार कु. मयुरी कुटे यांनी मानले. विद्यार्थी शिक्षक मनोगत मध्ये कु.अस्मिता सुतार हिचे मनोगत प्रभावी ठरले. 
     प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वैजयंती जगताप यांनी विद्यार्थ्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती सांगितली. तसेच प्राचार्य आणि उपमुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
     कार्यक्रमाचे नियोजन संस्कृती विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. श्री.वैभव सूर्यवंशी,श्री. संजय पालवे, श्री.सोमनाथ ढुमणे, श्रीमती शुभांगी कडू, श्रीमती.वैशाली ढाकणे, श्रीमती. स्नेहलता कांबळे, श्री.विक्रम शिंदे, श्रीमती किरण म्हस्के आणि श्रीमती स्वाती व्हरांबळे यांनी सहकार्य केले. श्री.वैभव सूर्यवंशी यांनी विद्यार्थी शिक्षक संख्या निश्चिती आणि वेळापत्रकाचे नियोजन केले.
      नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी शिक्षकांना आणि विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.