इंटरनेट युगातील सावधानता
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालया मध्ये प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स च्या विद्यार्थ्यांनी इंटरनेट युगातील सावधानता विषयावर विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.
सध्याचे युग इंटरनेटचे आहे कारण आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती मग ती खाण्याची, खेळण्याची, खरेदीची असो किंवा एखाद्या विषयाची, व्यक्तीची माहिती असो ती एका क्लिकवर आपल्याला मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर उपलब्ध होते. हे सर्व जरी खरे असले तरी त्याच्या दुष्परिणामांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.
'सायबर सिक्युरिटी अवेअरनेस' विषयानिमित्ताने प्रतिभा कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य विद्यार्थी करत आहेत. त्यापैकीच श्रावणी सावंत, मानसी वाडेकर आणि जोशवा रिवेरी यांनी प्रशालेमध्ये येऊन इंटरनेट वापराचे नियम आणि घ्यावयाची काळजी या विषयीची माहिती विविध उदाहर उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली. तसेच पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, श्री.महेश चोणगे, श्री.मोहनराव ढाणे,श्री.योगेश कोठावदे, आणि श्री.चंद्रकांत जोशी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
गुन्हेगारी युगामधील अशाच प्रकारच्या उद्बोधनाची गरज ओळखून शाळेने घेतलेल्या उपक्रमाचे नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजय भुरके आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले.