पर्यावरण विभागाचा अनोखा उपक्रम

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पर्यावरण विभागातर्फे अनोखा उपक्रम घेण्यात आला.   
     जून आणि जुलै महिन्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये भात शेतीची लागवड चालू असते. विद्यार्थ्यांना शेतीची आणि शेतीमध्ये चालणाऱ्या कामाची ओळख होण्यासाठी शाळेतर्फे क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.
      वरसोली येथील श्री.योगेश येवले यांच्या शेतामध्ये विद्यार्थांनी जाऊन भात लागवडीचा अनुभव घेतला तसेच शेतात  काम करणाऱ्या कामगारांबरोबर चर्चा करून शेती कामाची माहिती घेतली.
     क्षेत्र भेट आणि वृक्ष लागवड करताना विद्यार्थांनी पर्यावरणाचा आनंद घेतला. क्षेत्र भेटीसाठी आठवी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. क्षेत्र भेटीचे आयोजन श्री.योगेश कोठावदे आणि शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे यांनी केले.
     क्षेत्र भेटीला जाण्यासाठी प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात यांनी हिरवा कंदील दाखवला.
    शाळेमध्ये घेण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमाचे नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शालेय समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव