पाऊले चालती पंढरीची वाटं
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात आणि प्रशालेचे वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.
पालखी पूजनानंतर महाआरती घेण्यात आली आणि पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. मान्यवरांनी पालखी खांद्यावर घेऊन पालखीचे प्रस्थान केले. कोसळणाऱ्या पावसात देखील गळ्यामध्ये टाळ घेऊन आणि विठ्ठलाचा नामघोष करत विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला. विठ्ठलाच्या नामघोषणे प्रशालेचा परिसर भक्तीमय झाला होता.
पालखी सोहळ्यासाठी विद्यार्थी - विद्यार्थिनी पारंपरिक पोशाख.परिधान करू आणि गळ्यामध्ये तुळशी हार, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखी सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी झाले. यावर्षी विठ्ठल आणि रखुमाई बनण्याची संधी इयत्ता आठवी ड मधील चि.आदर्श खरात आणि इयत्ता सातवी अ मधील कु.तनुजा वाघ विद्यार्थिनीला मिळाला.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. श्री.महेश चोणगे आणि श्री.विक्रम शिंदे यांनी सुंदर फलक लेखन केले. कार्यक्रमाच्या तयारीसाठी श्री.गजानन कदम, श्रीमती आशा गवळी, श्री.सिताराम वैद्य, श्री. सिताराम घारे आणि श्री.मयूर पवार यांचे सहकार्य मिळाले.
पालखी सोहळ्यासाठी नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि सेवकांना शुभेच्छा दिल्या.
पालखी सोहळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यासाठी शिक्षक आणि सेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
https://youtu.be/1HG9Vl2LqOg?si=f4buTiNQyBgplcxa