आदर्श शिक्षक सन्मान सोहळा संपन्न

लोणावळा, पिंपरी चिंचवड येथे संपन्न झालेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनल आयोजित आदर्श शिक्षक सोहळा संपन्न झाला. यावर्षी  हा पुरस्कार व्ही.पी.एस हायस्कूल मधील जेष्ठ शिक्षक हरिभाऊ कुलकर्णी यांना प्राप्त झाला. पुरस्कार प्रदान सोहळा थोर समाजसेवक पद्मश्री प्राप्त गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाला या प्रसंगी प्रांतपाल राजेश कोठावदे उपप्रांतपाल सुनील चेकर तसेच लायन्स क्लब लोणावळा मधील विकास नायर व अग्रवाल उपस्थित होते.
       कुलकर्णी सरांनी आजवर केलेल्या कामाची दखल घेत सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. सरांनी आजवर विद्या प्रसारिणी सभेच्या भारत इंग्लिश स्कूल पुणे व व्ही पी एस हायस्कूल लोणावळा अशा विविध शाखांमधून जवळपास 29 वर्षाची सेवा केली.
            पुरस्कार ला उत्तर देताना सर म्हणाले की, त्यांनी आजवर घडवलेले हजारो विद्यार्थी आज देशात व देशाबाहेरील विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत या चे मला मोठे समाधान वाटते.
संपादक
संजय पालवे
Be Prepare News Lonavla
Mob. 7588693771
Mail Id. sanjaypalve06@gmail.com

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा