चित्रकला ग्रेड परीक्षेचे आयोजन

लोणावळा, दि.29/09/2022
       व्ही.पी.एस हायस्कूलमध्ये चित्रकला ग्रेड परीक्षेचे आयोजन करण्यात आले. परीक्षेसाठी लोणावळा आणि परिसरातील विविध विद्या शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
            सदर ग्रेड परीक्षा ही दोन प्रकारात घेतली जाते. एलिमेंट्री 28 व 29 सप्टेंबर आणि इंटरमिजिएट 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर या दिवशी पार पडणार आहेत. अशी माहिती केंद्रप्रमुख चंद्रकांत जोशी यांनी दिली.
       एलिमेंट्री परीक्षेस 714 विद्यार्थी आणि इंटरमिजिएट परीक्षेस 234 विद्यार्थी सहभागी झाले. सहभागी विद्यार्थ्यांना केंद्र संचालक प्रशालेचे प्राचार्य रामदास दरेकर यांनी शुभेच्छा संदेश देताना म्हटले की, दहावीच्या निकालामध्ये ग्रेड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या ग्रेडनुसार काही गुण मिळतात. विद्यार्थ्यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावून चित्र काढणे गरजेचे आहे.
     परीक्षेसाठी कलाशिक्षक योगेश कोठावदे, महेश चोणगे, विक्रम शिंदे आणि श्रीकांत म्हसकर यांनी परिश्रम घेतले.
संपादक
संजय पालवे
Be Prepare News Lonavla
Mob. 7588693771
Mail Id. sanjaypalve06@gmail.com

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव