सेवापूर्ती समारंभाचे आयोजन
लोणावळा , दि.29 सप्टेंबर
व्ही.पी.एस हायस्कूल मधील उपमुख्यध्यापक दादाभाऊ कासार आणि सहशिक्षिका सविता साळवेकर यांचा सेवापुर्ती कार्यक्रम प्रशालेमध्ये साजरा करण्यात आला.
आयोजन दोन दिवस वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष व्ही.पी.एस प्राथमिक विभागाचे शाळा समिती अध्यक्ष अरविंदभाई मेहता आणि प्रशालेचे प्राचार्य रामदास दरेकर लाभले.
प्रमुख पाहुण्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, लोणावळा शहर नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शाळा समिती सदस्य भगवान आंबेकर, संदीप अग्रवाल ,भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगरच्या प्राचार्य उज्ज्वला पिंगळे उपस्थित होते. सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतामध्ये 31 वर्ष अविरत केलेल्या ज्ञानदानाबद्दल समाधान व्यक्त केले. नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी आपापली मनोगते व्यक्त करताना, त्यांच्या सहवासातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्ष अरविंदभाई यांनी त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा दिल्या.
मेधाताई यांचे मनोगत सर्व मान्यवर व कार्यक्रमास उपस्थित असणारे शिक्षक वृंद यांना खऱ्या अर्थाने भावले. मेधाताई या सत्कारमूर्ती कासार यांच्या वर्ग मैत्रीण आहेत. याप्रसंगी त्यांनी आपल्या शैक्षणिक काळातील गमती जमती सांगितल्या. त्याचबरोबर शिक्षक हा घटक समाजामध्ये कसा महत्त्वाचा आहे याचे दाखले सर्वांना दिले. शिक्षकांवर लादल्या जात असलेल्या शालाबाह्य कामाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा परदेशी आणि क्षमा देशपांडे ,प्रस्ताविक आदिनाथ दहिफळे आणि विजय रसाळ , सरस्वती वंदन धनंजय काळे तर आभार सुनिता ढिले यांनी मानले.
संपादक
संजय पालवे
Be Prepare News Lonavla
Mob. 7588693771
sanjaypalve06@gmail.com