निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
लोणावळा, 03ऑक्टोबर
सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय तळेगाव दाभाडे यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
निबंध स्पर्धा पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला गट अश्या तीन गटांमध्ये घेण्यात आली.
स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक साक्षी शेळके (रामभाऊ परुळेकर हायस्कूल तळेगाव दाभाडे), द्वितीय क्रमांक अर्पिता लालगुडे (कांतीलाल शहा इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे), तृतीय क्रमांक आदिती घारे (जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे), आठवी ते दहावी गटामध्ये प्रथम क्रमांक प्रणव पोवार (रामभाऊ परुळेकर हायस्कूल), द्वितीय क्रमांक श्वेता घाडगे (संत तुकाराम विद्यालय), तृतीय क्रमांक हर्षवर्धन कुलकर्णी (जैन हिंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे) विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
खुल्या गटातील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गंगाधर गिरमकर (व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळा, सहशिक्षक), द्वितीय क्रमांक सुवर्णा गायकवाड (आंबळे शाळा), तृतीय क्रमांक प्रतिभा देवकर (आनंद विद्यालय तळेगाव दाभाडे) विभागून ज्योती कोरे शिक्षकांनी पारितोषिक संपादन केले.
स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्वरा पन्हाळे, तेजस्विनी दाभाडे, श्वेता झावरे, दीपिका ढेंबे, ज्योती पन्हाळे आणि नेहा पोवार यांना वेगवेगळ्या गटामधून उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
महात्मा गांधी जयंती चे अवचित्य सादर स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलगे, ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश धोत्रे, सचिव वर्षा वाढोकर , गडसिंग , खजिनदार काळे, अमित बांदल, नगरसेवक (त.दा.न) उल्हास भगत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
संपादक
संजय पालवे
Be Prepare News Lonavla
Mob. 7588693771
sanjaypalve06@gmail.com