सेवापूर्ती समारंभ संपन्न

लोणावळा, 15 ऑक्टोबर
     विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता ज्युनिअर कॉलेज लोणावळा चे प्राचार्य रामदास दरेकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आज प्रशालेच्या प्रकाश हॉल मध्ये पार पडला.
      विद्या प्रसारिणी सभेच्या विविध शाखेमध्ये  मिळून 32 वर्षे सेवा झाली. एकूण सेवेमध्ये जास्तीत जास्त सेवा लोणावळ्यांमधील व्ही.पी.एस हायस्कूलमध्ये पार पडली.
       कार्यक्रमासाठी अध्यक्ष डॉ. सतीश गवळी, प्रमुख पाहुणे नंदकुमार वाळुंज (उद्योजक), वच्छलाताई वाळुंज, भगवान आंबेकर, (सामाजिक कार्यकर्ते) बबन आंबेकर, शाळा समिती अध्यक्ष व्ही.पी.एस प्राथमिक अरविंदभाई मेहता, निखिल कवीश्वर (नगरसेवक लोणावळा नगरपरिषद), उमाताई मेहता, लिजियाड ग्रुपचे पदाधिकारी राजू बोराटे, (सामाजिक कार्यकर्ते) मनोज लऊकर उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती रामदास दरेकर  यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा दरेकर, उपमुख्याध्यापक उदय महेंद्रकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षिका सुनीता ढिले, पर्यवेक्षक विजय रसाळ मुख्य लिपिक कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी चंद्रकांत जोशी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव प्राथमिक विभाग इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका भारती लोखंडे, बीसीएस महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर भगत, शेठ हिरालाल प्रशालेचे प्राचार्य संतोष पवार भारत इंग्लिश स्कूल प्राचार्या उज्ज्वला पिंगळे, गुप्ता हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा क्षीरसागर कार्यक्रमास उपस्थित होते.
     दरेकर शारीरिक शिक्षक म्हणून प्रशालेमध्ये सन 1989 ला सभेमध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांच्या आज वरच्या सेवाकाळामध्ये खूप चढ - उतार आले. परंतु आलेल्या संकटाना सामोरे जात त्यांनी आपली वाट सुखकर केली.
     आज पर्यंत त्यांच्या हातून हजारो विद्यार्थी घडून गेले. त्यांचे विद्यार्थी देशातील तसेच परदेशामध्ये महत्त्वाच्या पदांवर आपल्या गुरुजनांचे आणि शाळेचे नाव रोशन करत आहेत.
     सरांचा जनसंपर्क दांडगा असल्या मुळे लोणावळा आणि परिसरात त्यांची ओळख चांगली आहे. त्यांच्या प्रयत्नानेच दरवर्षी शाळेतील गरीब विद्यार्थांची शालेय फी एखाद्या दानशूर व्यक्ती कडून भरून घेतली जाते. आणि या महान कार्याची कोठे वाच्यता देखील ते करत नाही. यामध्ये त्यांचा मोठेपणा आपणास दिसून येतो.
     आपल्या कुटुंबाला आणि सग्यासोयऱ्याना एकत्र बांधून ठेवण्याची त्यांच्यामध्ये फार मोठी कला आहे. याची प्रचिती त्यांच्या कार्यक्रमात दिसून आली. सेवापूर्ती सोहळ्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, विविध शाळेचे मुख्याध्यापक, आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    दरेकर सर शारीरिक शिक्षणाबरोबरच स्काऊट आणि गाईड शिक्षक म्हणून देखील  मोठ्या प्रमाणावर ख्याती संपादन केली.
देश-विदेशामध्ये स्काऊट आणि गाईड ची पथके ते घेऊन जात तसेच राष्ट्रपती ढाल संपादन करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ ढुमणे, गायत्री जमखिंडिकर आणि प्रास्ताविक उदय महेंद्रकर यांनी केले. धनंजय काळे यांनी स्वागत गीत तर पर्यवेक्षिका सुनिता ढिले यांनी आभार मानले.

संपादक
संजय पालवे
Be Prepare News Lonavla
Mob. 7588693771
 sanjaypalve06@gmail.com
     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा