वाचन प्रेरणा दिन साजरा
लोणावळा,15 ऑक्टोबर
भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन राज्यभर 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता महाविद्यालय मळवली (भाजे ) येथे 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक प्रतिनिधी जालिंदर बनकर यांनी केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त देविदास खेडकर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना असे म्हटले की, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असलेले डॉ.अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. गुळगुळीत मन आणि दयाळू स्वभाव त्यांचे वैशिष्ट्य होते. डॉ. कलाम यांनी देशातील तरुण पिढींला आपल्या विचारांनी आणि कृतीने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण केला होता. त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये त्यांनी वर्णन केले आहे की, येत्या काही वर्षात भारत हा महासत्ता म्हणून असा उदयाला येईल आणि भारताची खरी ताकद येथील तरुणाई असेल.
डॉ. कलाम नेहमी म्हणायचे की, चांगले पुस्तक हे शंभर मित्रासारखे असते. म्हणून शालेय मुलांनी डॉ. अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचावी आणि त्यामधून नवीन प्रेरणा घ्यावी. 15 ऑक्टोबर हा दिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करून तो सोडून देऊन चालणार नाही तर या दिवसाचे महत्त्व प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे.
कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्या वर्षा क्षीरसागर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कलाशिक्षक धुळाजी देवकाते, गणेश गायकवाड, मनोहर भोसले, बाळू शिरसाट, विजय कवडे, परमेश्वर खाटपे, अंजली आंबेकर आणि मनीषा भगत या शिक्षकांनी कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त सहभाग दाखवला.
संपादक
संजय पालवे
Be Prepare News Lonavla
Mob. 7588693771
sanjaypalve06@gmail.com