विद्या प्रसारणी सभेच्या शतक महोत्सवानिमित्त दीपोत्सव
लोणावळा, 21 ऑक्टोबर
श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री विद्या बालक मंदिर भाजे- मळवली या शाळेच्या प्रांगणामध्ये दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला.
प्रसारिणी सभेच्या शताब्दी वर्षानिमित्त शालेय इमारत व प्रांगण हजारो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला. तसेच आकाशात दिव्यांनी सजलेले आकाश कंदील सोडण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकाश कंदीलांनी शालेय इमारतीची शोभा वाढविली. विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गो. व्यं. शिंगरे आणि संस्थेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी यांच्या प्रेरणेने दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या वर्षा क्षीरसागर व श्री विद्या बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका स्वाती रगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक व शिक्षकेतर आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दीपोत्सव संपन्न झाला.
छोट्या चमूंनी मातीचा आकर्षक किल्ला तयार केला. प्रसंगी प्रशालेतील शिक्षक मकरंद गुर्जर, कलाशिक्षक धुळाजी देवकाते, विजय कवडे, संभाजी तुपे, बाळू शिरसाट , परमेश्वर खाटपे, शिक्षक प्रतिनिधी जालिंदर बनकर शिक्षकेतर प्रतिनिधी मुकुंद भोसले, पवन घोरपडे, काजल रणदिवे, सीमा सिंह, अनुजा वाघमारे, रेखा गोणते, सेविका अल्का अंबुरे, राधा शेलार, नामदेव कडू, राजाराम राजपूत उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
संपादक
संजय पालवे
Be Prepare News Lonavla
Mob. 7588693771
sanjaypalve06@gmail.com