सिनेट मतदानाला सर्वसाधारण प्रतिसाद
तळेगाव दाभाडे, 20 नोव्हेंबर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट प्रतिनिधी साठी आज झालेल्या मतदानामध्ये तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयामध्ये मतदारांचा सर्वसाधारण प्रतिसाद दिसून आला.
सकाळी दहा ते पाच या दरम्यान मतदान पार पडले. नोंदणीकृत पदवीधर मतदारांकडू उमेदवारांची निवड केली जाते. पदवीधर मतदार नोंदणी साठी मतदाराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून पदवी प्राप्त करणे अनिवार्य असते असेच मतदार नोंदनी करू शकतात.
आज पारपडलेल्या निवडणुकीकडे मतदाराने पाठ फिरवलेली दिसून आली, याचे कारण म्हणजे मतदारांना मिळालेले मतदान केंद्र त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूरच्या अंतरावर असल्यामुळे मतदार मतदानास जाण्यास इच्छुक नव्हते. मतदारांना मतदानासाठी मिळालेले मतदान केंद्र पंचवीस ते पन्नास किलोमीटर, तर काही मतदारांची मतदान केंद्र दीडशे ते दोनशे किलोमीटर पर्यंत असल्यामुळे दूरच्या केंद्रावर जाऊन मतदान करून येणे त्रासदायक असल्यामुळे मतदारांनी मतदानासाठी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
ज्या मतदारांना जवळची मतदान केंद्र मिळाली अशा मतदारांनी आपली हजेरी मतदार केंद्रावर लावून आपली मते नोंदवले.
संपादक
संजय पालवे
Be Prepare News Lonavla
Mob. 7588693771
sanjaypalve06@gmail.com