विद्याप्रसारणी सभेची सेंचुरी

लोणावळा, (संपादक : संजय पालवे)
     3 डिसेंबर विद्या प्रसारिणी सभेचा वर्धापन दिन व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता जूनियर कॉलेज मधील प्रकाश हॉलमध्ये दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.   
   कार्यक्रमासाठी सभेच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष आणि व्ही.पी.एस हायस्कूलच्या शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. गो.व्यं.शिंगरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी अध्यक्ष कार्यवाह डॉ.सतीश गवळी तर प्रमुख पाहुणे धीरूभाई टेलर लाभले.
     3 डिसेंबर 1923 विद्या प्रसारिणी सभेची स्थापना पुणे या ठिकाणी झाली आणि त्यानंतर पुणे आणि मावळ परिसरामध्ये २६ विविध शाखा उभारल्या गेल्या. विविध विद्या शाखेमधून आठ ते दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून पाचशे ते सहाशे कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत.
     आज सभा आपल्या शतक महोत्सवी वर्षांमध्ये पदार्पण करत आहे.९९ वर्षामध्ये  भारत इंग्लिश स्कूल पुणे, व्ही. पी. एस हायस्कूल लोणावळा, द.पू.मेहता जूनियर कॉलेज, विद्या प्रशाला भाजे-मळवली (शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय), विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम पुणे, अध्यापक विद्यालय, बी.सी.एस. आणि बी.बी. ए. कॉलेज(लोणावळा), व्ही.पी.एस इंजीनियरिंग कॉलेज वाकसई (लोणावळा), हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज (लोणावळा), फार्मसी कॉलेज वाकसई (लोणावळा) प्री प्रायमरी स्कूल भाजे-मळवली अशा विविध शाखा दिमाखात उभ्या आहेत.
     अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.सतीश गवळी  म्हणाले की, सभेच्या होणाऱ्या वाटचाली मागे नियामक मंडळाच्या अध्यक्षांचा दूरदृष्टीकोन आणि कर्मचाऱ्यांची मेहनत आहे ते पुढे म्हणाले की, आपणास जर या जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर आपण विज्ञानाची कास धरून विद्यार्थी घडवणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये आपल्या शाळे बद्दल आपुलकी निर्माण करावयास हवी. प्रमुख पाहुणे टेलर यांनी देखील विद्या प्रसारिणी सभेच्या होत असलेल्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
     कार्यक्रमासाठी कन्हैया भुरट, गिरीश पारख, अरविंदभाई मेहता, उस्मानभाई इनामदार, नितीन शहा, विद्या प्रसारणी सभेचे सदस्य भगवान आंबेकर, वरिष्ठ लिपिक कुंडलिक आंबेकर, प्राचार्या वर्षा क्षीरसागर (गुप्ता विद्यालय भाजे मळवली), बीसीएसचे प्राचार्य भगत सर, मुख्याध्यापिका मंगल जाधव(व्ही.पी.एस प्राथमिक), मुख्याध्यापिका भारती लोखंडे(व्ही.पी.एस इंग्लिश मिडीयम स्कूल) उपस्थित होते.
       अहवाल वाचन शिक्षक प्रतिनिधी चंद्रकांत जोशी यांनी सादर केले. तसेच सूत्रसंचालन सोमनाथ ढुमणे, प्रस्तावना प्राचार्य अंजनी गानू , ईशस्तवन पर्यवेक्षिका सुनीता ढिले, स्वागतगीत क्षमा देशपांडे, अध्यक्ष व पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापक उदय महिंद्रकर आणि पर्यवेक्षक विजय रसाळ, आभार ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे तर पसायदान धनंजय काळे यांनी सादर केले.

     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव