बालचमुंचा क्रीडा मेळावा

लोणावळा, (संपादक : संजय पालवे)
     विद्या प्रसारिणी सभेच्या श्री विद्या बालक मंदिर ,भाजे या शाळेत संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. गो. व्य. शिंगरे साहेब व संस्थेचे कार्यवाह मा.डॉ. सतीश गवळी सर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली  दिनांक 12 ते 14 डिसेंबर, 2022  या कालावधीत वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.              कोरोना काळातील दोन वर्षां नंतर शाळेतील सर्व विद्यार्थी मोठया उत्साहाने विविध खेळांमध्ये सहभागी झाले. शाळेत लहान मुलांसाठी बेडूक उडी, चमचा लिंबू, पोत्यातील उडी , तीन पायांची शर्यत , बॉल इन द बकेट तर मोठ्या गटातील मुलांसाठी दोरी उडी , लांब उडी, उंच उडी , थाळी फेक, लंगडी , कबड्डी, रस्सी खेच अशा वैयक्तिक तसेच सांघिक विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. 
       क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक व संस्था पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रगडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी श्री मकरंद गुर्जर यांनी  विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच मुख्याध्यापिका सौ. स्वाती रगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.          क्रीडा स्पर्धा कालावधीत शाळेतील सहशिक्षिका सौ. शिल्पा आंबेकर, सौ.सुषमा येवले, सौ. काजल रणदिवे, सौ. रेखा गोणते, सौ. सीमा सिंग, सौ.संगीता पवार, सौ.अनुजा वाघमारे यांनी क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच श्री मुकुंद भोसले व  शाळेच्या सेविका सौ.राणी शेलार, सौ.उज्ज्वला कडू, सौ.राधा शेलार, सौ. अलका अंबुरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा