सेंट उर्सुला हायस्कूल अव्वल स्थानी
लोणावळा, (संपादक : संजय पालवे )
पुणे जिल्हा परिषद आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये बास्केटबॉल पू खेळ प्रकारामध्ये सेंट उर्सुला हायस्कूल ( मुलींचे ) आकुर्डी यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी कमलनयन बजाज स्कूल संभाजीनगर यांचा 19-07 असा पराभव करून अव्वल स्थान पटकावले.
सिटी प्राईड स्कूल ( प्राधिकरण ) ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या बास्केटबॉल स्पर्धेमध्ये 14 वर्षाखाली वयोगटातील सेंट उर्सुला हायस्कूल ( आकुर्डी ) मुलींच्या संघाने प्रथम क्रमानं प्राप्त केला.
तत्पूर्वी सेमी फायनल सामन्यांमध्ये सेंट ऊर्सुला स्कूल ने आर्मी पब्लिक स्कूल (देहूरोड) संघाचा 32-06 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
डर्बीमध्ये अंतिम सामना खेळला गेला यामध्ये सुरुवातीपासूनच उर्सुला संघाचे वर्चस्व होते. खेळ करत असताना सर्वच खेळाडूंनी खेळाची चमक दाखवू समोरील खेळाडूवर वर्चस्व संपादन केले. युविका कोल्हे ( 8 ), रिया बोरा ( 6 ), एलशा ( 3 ), अन्विता बोरा ( 2 ) गुण मिळून यशात भर पडली.