प्रवाशांचे अतोनात हाल

तळेगाव दाभाडे, ( संपादक: संजय पालवे )
      नगर - पुणे महामार्गावर आज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागला. पाबळ - चौक - चाकण चौक करंदी पर्यंत वाहने उभी होती. या गर्दीमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नोकर वर्ग यांचे अतोनात हाल झाले.
    
     शनिवार असल्यास मुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बस, रुग्णवाहिका सुद्धा पूर्णपणे अडकून पडला.
      मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली असून देखील गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिस नसावे हे नवलच आहे. या मुळे प्रवाशी मोठ्याप्रमाणावर नाराज झाले.  शिक्रापूर मध्ये वाहतूक कोंडी होणे हे प्रवासासाठी नवीन गोष्ट नाही परंतु सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान इतकी मोठी वाहतूक कोंडी ही आश्चर्याची गोष्ट आहे.
      वाहतूक कोंडी पासून सुटका मिळण्यासाठी कित्येक वर्षापासून ची उड्डाणपुलाची मागणी असून देखील ती पूर्ण न झाल्यामुळे प्रवासीना व नागरीकाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा