आरोग्य हेच शाश्वत सत्य
लोणावळा, 5 डिसेंबर (संपादक: संजय पालवे)
विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालय (सेमी इंग्रजी माध्यम) मध्ये लोणावळा नगरपालिका रुग्णालय लोणावळा यांच्यामार्फत इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात आजाराचे लसीकरण करण्यात आले. या साठी आरोग्य सेविका रुपाली मोहिते आणि श्रद्धा कांबळे यांनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंगल जाधव यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे आपल्या जीवनात किती महत्व आहे याची जाणीव करून दिली.
विद्या प्रसारिणी सभा संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. डॉ. गो. व्यं. शिंगरे (बाबा) आणि संस्थेचे कार्यवाह श्री. डॉ. सतीश गवळी यांनी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी शुभेच्छा दिल्या.
ही मोहीम पारपडण्यासाठी श्री. संजय भालचिम,श्री.प्रकाश पाटील,श्री. हनुमंत शिंदे, श्री.महादेव शिरसाट, श्री.बापूराव भोसले, श्री.अमित रसाळ,शिक्षिका सौ. मनिषा जरग ,सौ.आशा खामकर सौ.सुनीता वरे, सौ.संगीता पाटील श्रीमती. स्वप्नाराणी भालेराव, शिक्षकेतर कर्मचारी श्री भिवाजी गायखे, श्रीमती.जयश्री बागलकोटे यांचे विशेष सहकार्य लाभले.