महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र आदरांजली
लोणावळा,6 डिसेंबर (संपादक:संजय पालवे)
श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे - मळवली प्रशालेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
वि. प्र. सभा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गो. व्यं. शिंगरे साहेब व संस्थेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी सर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. वर्षा क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची ओळख करून दिली व विद्यार्थ्यांना भारतीय घटनेच्या नियमावलींचे पालन एक नागरिक म्हणून करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. संस्था नियुक्त पर्यवेक्षक श्री. मकरंद गुर्जर यांनी डॉ. बाबासाहेबांनी आपली भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी किती कष्ट घेतले ते विशद केले व भारतीय राज्यघटना जगात श्रेष्ठ असल्याचे सांगितले. याप्रसंगी सकाळ विभाग व दुपार विभागातील विद्यार्थी प्रियांका नाचण , प्रांजल तिकोणे, अंशू नागर व आदित्य इकाळे या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व कार्य सांगितले.
याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी श्री.जालिंदर बनकर, सौ मनीषा जगताप, श्री बाळू शिरसाट, श्री. मनोहर भोसले, सौ. दिपाली गायकवाड, सौ.दिपाली खैरे, सौ.सुरेखा अहिरे, सौ.शामल तिकोणे, श्री.बाळासाहेब कोकणे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विजय कवडे व श्री गहिनीनाथ बारगजे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.जालिंदर बनकर यांनी केले.