गुप्ता विद्यालयात (भाजे) बालिका दिन साजरा
लोणावळा, (संपादक संजय पालवे)
श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे - मळवली या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. प्रशालेच्या प्राचार्या सौ वर्षा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचा जीवनपट व कार्यकर्तृत्व संस्था पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
स्वातंत्र्यपूर्वकाळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हाल अपेष्टा सोसून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे द्वार स्त्रियांसाठी खुले करून मोठी क्रांती घडवून आणली. त्यामुळेच आज सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळाले आहे.
प्रशालेतील कलाशिक्षक धुळाजी देवकाते आणि विजय कवडे यांनी फलक लेखन केले.प्रसंगी शिक्षक प्रतिनिधी जालिंदर बनकर, देविदास खेडकर, बाळू शिरसाट, मनोहर भोसले, मनीषा जगताप, गणेश गायकवाड आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.