भाजे येथील गुप्ता विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
लोणावळा, (संपादक संजय पालवे) श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे - मळवली या शाळेत राजमाता जिजाऊ यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
प्रशालेच्या प्राचार्या सौ वर्षा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या महान कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचा मोलाचा वाटा असल्याचे विशद केले. तसेच मॉं जिजाऊंनी केलेले संस्कार आजही उपयुक्त आहेत. स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे तत्वज्ञान संपूर्ण जगताला पटवून दिले. त्यांनी अध्यात्म आणि लोकसेवा यांची सांगड घातली. तसेच विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली. स्वामीजींचे तेजस्वी व राष्ट्राभिमानी विचार आजही तरुणांना प्रेरणादायी आहेत. स्वामी विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते.
इयत्ता १०वी तील विद्यार्थिनी कु. अंजू नागर हिने मनोगत व्यक्त केले. इयत्ता सहावीतील विद्यार्थी वेदांत संतोष येवले याने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली व काव्या प्रदीप भालेराव हिने राजमाता जिजाऊंची भूमिका वठवली. मोहिनी दळवी, दिव्या अत्तरदे, धनश्री बागव, सर्वज्ञा केदारी, पायल पवार, दिशा कदम, पायल जाधव या विद्यार्थिनींनी जिजाऊ वंदना नृत्य सादर केले. अर्णव साठे व हर्षदा देशमाने यांनी मनोगते व्यक्त केली. धनश्री दळवी या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा क्षीरसागर, संस्था पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर , शिक्षक प्रतिनिधी जालिंदर बनकर, शिक्षकेतर प्रतिनिधी मुकुंद भोसले तसेच गहिनीनाथ बारगजे, सुरेखा अहिरे, दिपाली गायकवाड, संभाजी तुपे, राजेंद्र होले, रोहिदास डिकोळे, श्रीराम तांदळे, ललिता पवार, कविता गायकवाड, श्यामल तिकोणे,
देविदास खेडकर, बाळू शिरसाट, मनीषा जगताप, गणेश गायकवाड, परमेश्वर खाटपे, मनोहर भोसले आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.
प्रशालेतील कलाशिक्षक श्री धुळाजी देवकाते व श्री विजय कवडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व फलक लेखन केले.