प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ ठरला
तळेगाव दाभाडे, (संपादक : संजय पालवे)
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर कॉलनी मधील सह्याद्री इमारती मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. परंतु योग्य प्रसंगावधान साधल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान हा थरारक प्रकार घडला. इमारतीच्या पार्किंग मध्ये असलेल्या मीटर बॉक्सला पहाटे शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या वेळेला सर्व सदनिकाधारक साखर झोपेत असल्यामुळे ही बाब लवकर कुणाच्याही लक्षात आली नाही. परंतु सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी उठलेल्या एका सदनीलेतील महिलेने आपल्या सदनिलेतील गॅलरी मधून बाहेर डोकावल्यामुळे इमारतीच्या पार्किंग मधून धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. घडत असलेल्या प्रकार पाहून त्या पूर्णपणे घाबरून गेल्या आणि त्यांनी याची कल्पना इमारतीतील रहिवाशांना फोन द्वारे दिली. त्यानंतर सर्वच सदनिका धारक आपल्या कुटुंबीयांसह इमारतीच्या बाहेर पडले. या प्रसंगाने भयभीत नागरिकांनी घटनेची कल्पना सामाजिक कार्यकर्ते मा.गणेशजी काकडे यांना दिली. श्री.काकडे यांनी कोणताही विलंब न लावत घटनास्थळाला भेट देऊन अग्निशामक दलाला कळवले. काही वेळातच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचून त्या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणली. सदर घटने मध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.परंतु नागरिकांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती.
इमारतीच्या पार्किंग मध्ये गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.यामध्ये पेट्रोल आणि सीएनजी प्रकार तील गाड्या आहेत.
भयभीत झालेल्या नागरिकांना श्री.गणेशजी काकडे व आसपासच्या रहिवाशांनी दिलासा दिला.