तळेगाव दाभाडे येथे चोरीचे सत्र सुरूच
तळेगाव दाभाडे (संपादक : संजय पालवे)
तळेगाव दाभाडे शहरामध्ये चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसापासून तळेगाव शहरांमधील विविध ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. रात्री प्रमाणे दिवसही चोरटे चोरी करण्यास घाबरत नाहीत.
आत्ताच काही दिवसांमध्ये चोरट्यांनी दुपारी घरात घुसून लाख रुपयेचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर काल रात्री 'इंद्रायणी विद्या मंदिर कॉलनी' मधील 'काकडे हाईट' इमारती मधून 'रंजन कुमार' नावाच्या व्यक्तीने नुकतीच खरेदी केलेली 22 हजार रुपयाची सायकल चोरट्याने इमारतीच्या पार्किंग मधून लंपास केली.
इमारतीचा परिसर सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद असताना देखील हा प्रकार घडला. चोरी करतानाचा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये पूर्णपणे कैद झालेला असून त्याची माहिती पोलीसना देण्यात आलेली आहे.
इमारत असोकी रोहाऊस त्याचा चोरट्यांना काहीही फरक पडत नसून सीसीटीव्हीकॅमेरा असताना देखील चोर आपली हिम्मत दाखवतात. याचा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.