'परीक्षा पे चर्चा' मध्ये व्ही.पी.एस चे शेकडो विद्यार्थी सहभागी

लोणावळा, (संपादक: संजय पालवे)
     विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावातून  मुक्त करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवाद साधला.  कार्यक्रमांमध्ये राज्यभरामधून मोठ्या प्रमाणामध्ये उस्फूर्त सहभाग दिसून आला.   
      'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमांमध्ये व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता ज्युनिअर कॉलेजच्या शेकडो विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना मोठ्या स्क्रीन वर दाखवण्यात आला. कार्यक्रम विद्यार्थ्यांनी अतिशय मन लावून ऐकून त्यामधून मोठ्या प्रमाणावर बोध घेतला. कोणतीही परीक्षा ही आपले शेवटचे ध्येय नसून अपयश ही यशाची पहिली पायरी आहे या गोष्टीचा उजाळा या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना झाला.
     परीक्षांमध्ये चीटिंग करून व कॉपी करून जरूर पास होता येते, परंतु जीवनामध्ये यामुळे अपयश नक्की येऊ शकते या गोष्टीवरती माननीय पंतप्रधान यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.
     दहावी आणि बारावीच्या तोंडावर आलेल्या परीक्षेमध्ये अपयश येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अतिशय मोलाचा ठरेल असे चिन्ह दिसत आहे. माननीय पंतप्रधान यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले, तसेच कष्ट, चिकाटी आणि जिज्ञासूपणा विद्यार्थ्यांनी अंगी बाळगावा असे आवाहन केले.
     'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा पालकांचा व शिक्षकांचा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल यामध्ये शंका नाही.
      कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ व जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशालेच्या प्राचार्या अंजनी गानु, शालासमिती सदस्य भगवान आंबेकर, उपमुख्याध्यापक उदय महेंद्रकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षिका सुनिता ढिले, पर्यवेक्षक विजय रसाळ, गंगाधर गिरमकर, संजय पालवे, श्रीनिवास गजेंद्रगडकर, संगणक विभागाच्या प्रमुख सिंग मॅडम आणि सर्व सेवक वर्गाने  मोलाचे सहकार्य केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा