व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष
लोणावळा, संपादक : संजय पालवे विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सांस्कृतिक विभागाच्या वतीने दोन सत्रांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षिकांसाठी तर दुपारच्या सत्रात हायस्कूलमधील विद्यार्थिनी व शिक्षिकांसाठी महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गजाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती प्रज्ञा शुक्ल, उपमुख्याध्यापक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. वैभव सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी श्री. कल्याण चौगुले आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री. सिताराम घारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या मैदानावर गोलाकार रचना करून व...