प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोणावळा, (संपादक: संजय पालवे)
विद्या प्रसारणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री विद्या बालक मंदिर,भाजे-मळवली शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रशालेच्या प्राचार्या सौ वर्षा क्षीरसागर व मुख्याध्यापिका सौ स्वाती रगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापिका स्वाती रगडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन झाले. प्रशालेतील ज्येष्ठ सेवक श्री राजाराम राजपूत यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापिका सौ रगडे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून स्वच्छ भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत तसेच शैक्षणिक व वैज्ञानिक प्रगतीपथावर असलेला भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. याप्रसंगी संस्था पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर व गहिनीनाथ बारगजे यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली.
संभाजी तुपे, देविदास खेडकर, सुरेखा अहिरे, कविता गायकवाड, दिपाली गायकवाड, परमेश्वर खाटपे, मनीषा जगताप, गणेश गायकवाड, मनोहर भोसले, ललिता पवार, शिक्षकेतर प्रतिनिधी मुकुंद भोसले, रोहिदास डिकोळे, दिपाली खैरे, श्यामल तिकोणे, दिपाली बिरादार, अंजली आंबेकर, शिल्पा आंबेकर, अनुजा वाघमारे, सीमा सिंग, सुषमा येवले, पवन घोरपडे इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र होले व बाळासाहेब कोकणे यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी जालिंदर बनकर यांनी आभार प्रदर्शन केले. कलाशिक्षक धुळाजी देवकाते व विजय कवडे यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध समूहगीते, मनोगते व नृत्ये सादर केली. पालक व माजी विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती. खाऊ वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला.