शासकीय चित्रकला परीक्षेत व्ही.पी.एस ची बाजी
लोणावळा, (संपादक : संजय पालवे)
मागील वर्षांमध्ये झालेल्या शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालामध्ये व्ही.पी.एस हायस्कूल बरोबरच श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली शाळेने बाजी मारली.
चित्रकलेच्या इंटरमिजिएट आणि एलिमेंट्री अशा दोन वेगळ्या परीक्षा शासनाकडून घेतल्या जातात या दोन्ही परीक्षेमध्ये व्ही.पी.एस हायस्कूल आणि गुप्ता विद्यालय या दोन्ही शाळेला घवघवीत यश प्राप्त झाले.
इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल व्ही.पी.एस हायस्कूलचा 97.14 तर गुप्ता विद्यालयाचा शंभर टक्के लागला. सदर परीक्षेमध्ये व्ही.पी.एस हायस्कूलचे चार विद्यार्थी 'अ' श्रेणी तर 76 विद्यार्थी 'ब' उत्तीर्ण झाले तसेच गुप्ता विद्यालयाचे नऊ विद्यार्थी 'ब' श्रेणीने तर चार विद्यार्थी 'क' उत्तीर्ण झाले. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल दोन्ही शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. परीक्षेमध्ये व्ही.पी.एस हायस्कूलचे बारावी विद्यार्थी 'अ' श्रेणीने उत्तीर्ण झाले तर गुप्ता विद्यालयाचे दोन विद्यार्थी 'अ' उत्तीर्ण झाले.
शासकीय परीक्षेला मार्गदर्शन करण्यासाठी व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळातील चंद्रकांत जोशी, महेश चोणगे, योगेश कोठावदे, विक्रम शिंदे तसेच गुप्ता विद्यालया मळवली येथील धुळाजी देवकाते, परमेश्वर खाटपे आणि विजय कवडे शिक्षकांची योगदान मोलाचे ठरले.
व्ही.पी.एस हायस्कूलच्या प्राचार्या अंजनी गाणू, उपमुख्याध्यापक उदय महेंद्रकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षिका सुनीता ढिले, पर्यवेक्षक विजय रसाळ तसेच श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयाच्या प्राचार्या वर्षा क्षीरसागर, संस्था पर्यवेक्षक मकरंद गुर्जर यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे कौतुक केले.