विद्यार्थ्यांना ग्राहक जागृतीचे धडे
तळेगाव दाभाडे, (संपादक : संजय पालवे) ता.4/02/2023 पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे'चे पंडित नेहरू विदयालय, कामशेत येथे बी.आय.एस ऑफ स्टॅंडर्ड क्लब चे ऑफिसर श्री हर्षमोहन शुक्ला सर व त्यांचे क्लब मेंबर श्री प्रसाद सर,श्री सुमित सर यांनी भेट दिली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री.शुक्ला सर यांचे हस्तेदीप प्रज्वलन करून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.धावडे एस.बी. उपमुख्याध्यापिका सौ.साबळे मॅडम व पर्यवेक्षिका सौ. ठोंबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
श्री.शुक्ला सर प्रत्यक्षात येऊन खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यामुळे विद्यार्थ्यांना बी आय एस चे कार्य अधिक* समजण्यास मदत झाली.
विद्यार्थ्यांना भारतीय मानक ब्युरो याविषयी पीपीटीद्वारे माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना स्टॅंडर्ड काय आहे व बी आय एस मध्ये स्टॅंडर्ड चे महत्व सांगितले. स्टॅण्डर्ड तीन प्रकारचे असतात आय. एस. आय.मार्क हे सिलेंडर, कुकर, हेल्मेट, टायर , इ. वस्तूवर रजिस्ट्रेशन मार्क इलेक्ट्रॉनिक साहित्य काम्यूटर, मोबाईल लॅपटॉप, कॅमेरा व हॉलमार्क हे गोल्डच्या दागिने वर असतात हे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना बिस्किट चे स्टॅंडर्ड करण्यास सांगितले. विदयार्थ्यांनी ग्रुप मध्ये बिस्कीटचे स्टॅण्डर्ड बनविले. इयत्ता 9 वी ब मधील विदयार्थीनी कु. अंकिता खानेकार हिने कार्यक्रमाचा उद्देश सांगून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी बी आय एस care ॲप वापर करू असे सांगितले. मान्यवरांचे आभार श्रीमती पाटील एच.व्ही. मॅडम यांनी केले. कार्यक्रमास सौ. शेळके आर.पी.व श्री मिंचेकर सर उपस्थित होते.