चिमूरड्यांचा गुणगौरव सोहळा

  लोणावळा,(संपादक : संजय पालवे) 
     विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालय लोणावळा शाळेत क्रीडा पारितोषिक वितरण आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शन उत्साहात पार पडले . नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. गो. व्यं. शिंगरे व संस्थेचे कार्यवाह मा.डॉ.सतीश गवळी सर यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.          कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगल जाधव यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी शाळेत होणारे विविध मैदानी खेळाची माहिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. अरविंदभाई मेहता शालासमिती अध्यक्ष यांनी भुषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.गोरख चौधरी सर उपस्थित होते. मा.डॉ.धीरूभाई कल्याणजी शालासमिती सदस्य, मा.श्री. गिरीषजी पारख साहेब शालासमिती सदस्य, मा. श्री. राजू खांडेभरड  पालक आणि माजी सरपंच वरसोली, मा.श्री.सागर कालेकर अध्यक्ष शालाव्यवस्थापन समिती श्री. माणिक मोकाशी हे उपस्थित होते. 
     प्रमुख पाहुणे मा.श्री.चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाची गोष्ट सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.अरविंदभाई मेहता साहेब यांनी आपल्या मनोगतात आजच्या स्पर्धेच्या युगात खेळला महत्वाचे स्थान आहे. आज बाल वयात विविध खेळात सहभागी झालेल्या आणि बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच शिक्षकांनी बसवलेल्या कवायत प्रात्यक्षिक सादरीकरणाचे कौतुक केले. 
    क्रीडा पारितोषिक कार्यक्रमासाठी शिक्षक श्री. संजय भालचिम, श्री. प्रकाश पाटील, श्री. हनुमंत शिंदे, श्री महादेव शिरसाट, श्री.बापूराव भोसले, श्री .अमित रसाळ, शिक्षिका सौ. मनिषा जरग, सौ. सुनिता वरे, सौ. आशा खामकर, सौ. संगिता पाटील, श्रीमती स्वप्नाराणी भालेराव या शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन आणि कवायत प्रात्यक्षिक सादरीकरण करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  खूप मेहनत घेतली. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. भिवाजी गायखे आणि श्रीमती जयश्री बागलकोटे यांनी विशेष मेहनत घेतली. सौ.सुनिता वरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. 
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रकाश पाटील  यांनी केले. श्री.अमित रसाळ यांनी वार्षिक क्रीडा अहवाल वाचन आणि बक्षीस पात्र विद्यार्थी यादी वाचन केले. तर सौ. मनिषा जरग यांनी  आभार मानले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा