कलावंतांचा सन्मान सोहळा संपन्न

लोणावळा, (संपादक: संजय पालवे)
     पुणे जिल्हा कलासंघातर्फे दिले जाणाऱ्या आदर्श कलाशिक्षक पुरस्काराचे वितरण नुकतेच पार पडले. या पुरस्कारासाठी मावळ तालुक्यामधून व्ही.पी.एस हायस्कूल मधील कलाशिक्षक विक्रम शिंदे यांची निवड झाली. पुणे या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या समारंभामध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. 
    समारंभ प्रसंगी जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद शेलार, संचालक हुसेन खान, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्याम साठे, कार्याध्यक्ष हेमंत नागवडे, सरचिटणीस बाहीत खान, खजिनदार भागुजी शिखरे, सहसचिव चंद्रकांत जोशी उपस्थित होते.
       विक्रम शिंदे सरांनी आत्तापर्यंत हजारो चित्र रेखाटले असून राज्याभिषेका सारखे देखणे चित्र त्यांनी अतिशय छान रेखाटले आहे. राज्याभिषेकाचा सोहळा कागदावरती रेखावताना त्यांनी पेनाचा वापर केला आहे. स्केच बनवण्याचे हा त्यांचा छंद आहे. अशा विविध कला त्यांनी कागदावरती उतरवलेल्या आहेत आणि या कलाचा उपयोग विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच सरांना संगीताची देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये आवड असल्यामुळे त्यांच्या शेकडो गाणे तोंडपाठ आहेत.
     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा