व्ही.पी.एस मध्ये शिवजयंती आणि क्रीडा दिन उत्सव साजरा
लोणावळा, (संपादक: संजय पालवे)
देश विदेशामध्ये शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालय मध्ये शिवजयंतीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
आजचा शिवजयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहासामध्ये निपुण असणारे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सतीश साठे, ओमकार साठे आणि महेश गायकवाड त्यांचे सहकारी यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. त्याचबरोबर इतिहासातील काही गोष्टी द्वारे महाराजांनी रयतेसाठी जे राज्य निर्माण केले आणि त्या साठी त्यांना घ्यावयास लागलेली अपार कष्ट श्री.सतीश साठे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
शिवजयंतीच्या औचित्य साधून प्रशालेमध्ये क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले विविध पारितोषकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्य श्रीमती अंजनी गानू, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रश्न उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, सकाळ विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. सुनीता ढिले, शिक्षक प्रतिनिधी श्री.चंद्रकांत जोशी, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.जयराम उंबरे उपस्थित होते.
आज बाळ शिवाजी म्हणून रुद्र शिंदे विद्यार्थ्याला मान मिळाला त्याने शिवगर्जना देत सर्वांना भारावून टाकले. त्याचबरोबर दुसरी मधील शिकणारी आराध्या या विद्यार्थी विद्यार्थिनीने आपल्या पहाडी आवाजामध्ये महाराजांचा पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे श्री.चंद्रकांत जोशी सर यांनी बसवलेले बर्ची पथक आणि सौ.स्वाती व्हरांबळे मॅडम यांनी बसवलेली बांबू नृत्य होय.
शिवाजी महाराज जयंती निमित्त बाळ शिवाजी झालेल्या रुद्र शिंदे व विद्यार्थ्यांनी कमावलेल्या विविध पारितोषिका निमित्त प्रशालेच्या प्राचार्य श्रीमती.अंजली गानू यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षिका श्रीमती वैशाली तारू यांनी केले आणि त्यांना इयत्ता पाचवी ते सातवी चे वर्गशिक्षक, त्यांना शिकवणारे शिक्षक, सेवक गजानन कदम यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुनिता इथापे तर आभार शिक्षक प्रतिनिधी चंद्रकांत जोशी यांनी मांडले.