श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात क्रीडा दिन उत्साहात साजरा

     विद्या प्रसारणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे या शाळेत नुकताच क्रीडा दिन व क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गो.व्यं. शिंगरे साहेब यांच्या प्रेरणेने व संस्थेचे प्रभारी कार्यवाह व शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश गवळी सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. प्रशालेच्या प्राचार्या सौ. वर्षा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. मा. श्री सचिन ठाकर, पत्रकार दैनिक लोकमत व मावळची सुवर्णकन्या सुप्रसिद्ध थायबॉक्सिंग चॅम्पियन व राष्ट्रीय खेळाडू कु. तृप्ती निंबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्त वेधक सुंदर कवायती सादर करण्यात आल्या व मान्यवरांच्या शुभहस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 
     शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा दिनाचे औचित्य साधून लाठीकाठी, डंबेल्स, घुंगुर काठी, झेंडा कवायत, दांडिया कवायत, रिंग कवायत, परेड, मानवी मनोरे, खडी कवायत, सूर्यनमस्कार, ढोल पथक यांची सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. बालक विद्यामंदिरच्या छोट्या मुलांनी योगा डान्सचे सुंदर सादरीकरण केले. अतिशय सुंदर व रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात विद्यार्थ्यांचा उत्साह व शिक्षकांचे परिश्रम होते. याप्रसंगी दैनिक लोकमतचे पत्रकार श्री सचिन ठाकर यांनी आपले शालेय अनुभव विद्यार्थ्यांना सांगत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच खूप लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गाडीची सोय व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच करीत आश्वस्थ केले. 
     थायबॉक्सिंग खेळातील अग्रगण्य नाव असलेल्या मावळच्या सुवर्णकन्या कु. तृप्ती निंबळे यांनी या खेळामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण प्रयत्न, जिद्द व मेहनतीने कसे यश मिळविले हे विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले व विद्यार्थ्यांना आपले नाव उज्वल करण्यासाठी कानमंत्र दिला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे ढोल पथकाच्या गजरात औक्षण करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाला समितीचे सदस्य श्री उस्मान इनामदार, श्री विद्या बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रगडे उपस्थित होते. 
     कार्यक्रमाचे नियोजन संस्था पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक श्री गहिनीनाथ बारगजे, शिक्षक प्रतिनिधी श्री जालिंदर बनकर, शिक्षकेतर प्रतिनिधी मुकुंद भोसले, संभाजी तुपे, बाळासाहेब कोकणे, रोहिदास डिकोळे, राजेंद्र होले, मनोहर भोसले, बाळू शिरसाट, गणेश गायकवाड, ललिता पवार, सुरेखा अहिरे, कविता गायकवाड , दिपाली गायकवाड, मनीषा जगताप, श्यामल तिकोणे, श्रीराम तांदळे, परमेश्वर खाटपे, दिपाली खैरे, दिपाली बिरादार, पवन घोरपडे व बालक मंदिराच्या शिक्षिका शिल्पा आंबेकर, सीमा सिंग, सुषमा येवले, अनुजा वाघमारे तसेच शिक्षकेतर सेवकवर्ग सर्वांनी परिश्रम घेतले.  
   पाहुण्यांचा परिचय मकरंद गुर्जर यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय कवडे यांनी केले. स्टेज व्यवस्था व सुशोधन कलाशिक्षक श्री धुळाजी देवकाते यांनी केले. क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव