विना दप्तर शाळा उपक्रम
लोणावळा, (संपादक: संजय पालवे)
व्ही.पी.एस हायस्कूल मध्ये शिक्षक प्रतिनिधी व कलाशिक्षक श्री चंद्रकांत जोशी सर व कलाशिक्षक श्री योगेश कोठावदे सर यांच्या कल्पक योजनेतून, आज इयत्ता पाचवी ते सातवी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 'विना दप्तर शाळा 'हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रमा अंतर्गत रायवूड पार्क लोणावळा, येथे अत्यंत सुनियोजित पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम, तसेच वैयक्तिक कलागुणांना वाव देणारे, विविध उपक्रम व खेळ यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 530 विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. सर्व वर्गशिक्षक सर्व ज्येष्ठ शिक्षक, तसेच माननीय पर्यवेक्षिका सौ सुनिता ढिले मॅडम , सर्वांनीच सक्रिय सहभाग घेतला. अत्यंत शिस्तबद्ध व उत्साह पूर्ण वातावरणात हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची पाने ,फुले यांच्या माध्यमातून अत्यंत सुबक व आकर्षक रांगोळ्यांचे प्रदर्शन मांडले होते. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका श्रीमती अंजनी गानू मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.