ज्येष्ठ शिक्षणतज्ञ हरपला
लोणावळा, (संपादक: संजय पालवे)
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्या प्रसारिणी सभेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ.गोवर्धन व्यंकटेश शिंगरे साहेब (बाबा) यांचे वयाच्या ८० व्या वर्षी यांचे प्रदीर्घ आजाराने आज दुपारी दोन वाजता दुःखद निधन झाले. विद्या प्रसारिणी सभेचे कुटुंब प्रमुख म्हणून अखेर पर्यंत बाबा कार्यरत होते.
बाबांनी सभेसाठी अपार कष्ट घेत विविध विद्या शाखा उभ्या केल्या. समाजामध्ये त्यांना मनाचे आणि आदराचे स्थान होते. विद्या प्रसारिणी सभेमधील प्रत्येक कर्मचाऱ्यांबरोबर बाबांचे जिव्हाळ्याचे प्रेमपूर्वक संबंध होते. बाबांच्या जाण्याने विद्या प्रसारिणी सभेचे भरून न येणारे नुकसान झालेले आहे.
बाबांचे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी विद्या प्रसारिणी सभा पुणे, 5 संस्थेच्या भारत इंग्लिश स्कूल येथे संध्याकाळी ७ वाजता आणण्यात येईल.