आदित्यची सुवर्णपदकाला गवसणी
लोणावळा, (संपादक: संजय पालवे)
विद्या प्रसरिणी सभेचे व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या आदित्य मोरे या विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीयताय तायक्वांदो स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त करून शाळेची आणि मावळ तालुक्याची मान गर्वाने उंचावली आहे.
आदित्य मिळवलेल्या या बहुमोल यशाबद्दल सभेचे शाळा समिती अध्यक्ष आणि नियमित मंडळाचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन शिंगरे (बाबा) साहेब, कार्यवाह डॉ. सतीश गवळी साहेब, शाला समिती सदस्य भगवान आंबेकर(भाऊ) यांनी मनापासून कौतुक केले, आणि त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केला.
आदित्यने मिळवलेल्या यशाबद्दल शाळेच्या शिरपेच्यामध्ये एक मानाचा तुरा खोवला गेला. यामुळे प्रशालेच्या प्राचार्य अंजनी गानू, उपमुख्याध्यापक उदय महिंद्रकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षिका सुनीता ढिले, पर्यवेक्षक विजय रसाळ तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून त्याचे कौतुक होत आहे.