डॉ.संदीप गाडेकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड


           संपादक : संजय पालवे, वडगाव मावळ दि.15 
              श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयातील  डॉ. संदीप गाडेकर यांची प्रशासन व मूल्यमापन विषयाच्या अभ्यास मंडळावर नुकतीच नेमणूक झाली आहे. 
        आतापर्यंत डॉ. संदीप गाडेकर यांनी 20 शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रसिद्ध केले असून एकूण 4 विद्यार्थ्यांना पीएच.डी चे मार्गदर्शन सुरू आहे.  तसेच 40 राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पर शोध निबंध सादर केलेले आहे.  व आत्तापर्यंत एकूण 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  त्याच्या निवडीबद्दल  संस्थेचे सचिव श्री.अशोक बाफना  , अध्यक्ष श्री.तुकाराम असवले व सर्व संचालक मंडळ व प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता धायगुडे  यांनी अभिनंदन केले. व  पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या दरम्यान ही निवड झाल्याने त्यांना अधिक भरीव कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव