श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयाचे यश
लोणावळा, (संपादक: संजय पालवे)
भाजे - मळवली येथील विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयाचा निकाल ७७.६८ टक्के लागला असून यामध्ये प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे
प्रथम कु.धनश्री योगेश शेलार (86.80%), द्वितीय फैजान सनाउल्लाह शेख (83.60%), तृतीय कु.रसिका गणेश चव्हाण
(82.80%) या तीन विद्यार्थ्यांनी अनुक्रमे यश मिळवले.
दहावीतील सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन विद्या प्रसारिणी सभेचे कार्यवाह व शाला समिती अध्यक्ष डॉ.सतीश गवळी व शाळा समितीचे सर्व सदस्य, नूतन प्राचार्य संतोष पवार, प्राचार्या वर्षा क्षीरसागर, बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका स्वाती रगडे, संस्था पर्यवेक्षक मकरंद गुर्जर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.