यशाची परंपरा अबाधित
चाकण, (संपादक:संजय पालवे)
बिरदवडी येथील ज्योतिबा एज्युकेशन सोसायटी संचालित बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षांचे निकाल नुकताच जाहीर झाला असून शाळेचा एकूण निकाल 98.50% लागला.
विद्यालयातील पाहिले तीन क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक - चि.नवले साहिल श्रीकांत(84.20%), द्वितीय क्रमांक - कु. सातपुते दुर्गा कैलास (75.20%), तृतीय क्रमांक - कु.पडवळ प्रांजली सुरेश (74.20%)
चि. फडके ओमकार संतोष (74.20%). उज्वल निकालाची विद्यालयाची परंपरा कायम ठेवल्यामुळे सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे व सर्व पालकांचे संस्थेच्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार मॅडम, सचिव श्री.ईशानदादा यशवंत पवार, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी संस्थेने व विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अशी माहिती वर्गशिक्षक श्री दादासाहेब ढाकणे यांनी दिली.