पारंपरिक पोशाखात चिमुरड्यांचा दिंडी सोहळा

लोणावळा, (संपादक संजय पालवे)
      विद्या प्रसारिणी सभा संस्थेचे व्ही. पी. एस प्राथमिक विद्यालय लोणावळा येथील शाळेत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील शिक्षिका सौ. मनिषा जरग मॅडम होत्या.   
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. हनुमंत शिंदे यांनी केले.वारीची माहिती शाळेतील शिक्षक श्री.बापूराव भोसले यांनी आपल्या मधुर वाणीतून अभंग गाऊन सांगितली.शाळेतील विद्यार्थी सुंदर वारकरी बनून नटून थटून आले होते. शाळेत संतांची वेशभूषा करून विद्यार्थी आले होते.संतांचे अभंग, गाणी त्यांनी स्वतः म्हटली. इ 4 थी तील विद्यार्थ्यांनी वारीचे छान गाणे सादर केले.ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करीत रिंगण सोहळा  कार्यक्रम पार पडला. त्यात फुगडी खेळणारे, टाळकरी, तुळशी वृंदावन घेऊन पाळणारे अशा वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्यात आपली कला सादर केली. 
     संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणाली गरवारे, कार्यवाह डॉ. श्री. सतीश गवळी सर, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके सर यांनी विद्यार्थ्यांना पालखी सोहळा कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. मनिषा जरग, सौ. सुनिता वरे, श्रीमती. स्वप्नाराणी भालेराव, सौ. आशा खामकर, सौ. संगिता पाटील शिक्षक श्री संजय भालचिम, श्री. प्रकाश पाटील, श्री. हनुमंत शिंदे, श्री. महादेव शिरसाट, श्री. बापूराव भोसले, श्री. अमित रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती. जयश्री बागलकोट यांनी मेहनत घेतली.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमित रसाळ यांनी केले तर सौ. सुनिता वरे यांनी आभार मानले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव