भाजे हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

(मळवली, संपादक : संजय पालवे)
      श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे-मळवली या शाळेत 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.            विद्या प्रसारिणी सभेच्या नियमक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे व संस्थेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी यांच्या प्रेरणेतून कार्यक्रम घेण्यात आला. प्रशालेचे प्राचार्य श्री. संतोष पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यवेक्षक श्री. मकरंद गुर्जर यांनी कार्यक्रमाचे नियोजन व संचालन केले. योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करण्यात आले. तसेच योग दिनानिमित्त सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, ओंकार व भ्रामरी इत्यादी घेण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री.प्रशांत घाडगे , शिक्षक प्रतिनिधी देविदास खेडकर  व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले. 
       कलाशिक्षक श्री. धुळाजी देवकाते व श्री. विजय कवडे यांनी फलक लेखन व सुशोधन केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा