पालखीच्या दर्शनाने गावकरी धन्य
मळवली, (संपादक : संजय पालवे)
विद्या प्रसारिणी सभेचे श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि श्री विद्या बालक मंदिर, भाजे शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठूनामाच्या जयघोषाने भाजे- मळवली चा परिसर दुमदुमला.
संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराजांची पालखी आकर्षकपणे सजविलेली होती. विविध संताचा पेहराव धारण करित वारकरी वेशात शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशालेचे प्राचार्य श्री.संतोष पवार व बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रगडे यांनी पालखीचे पूजन केले. शिक्षक प्रतिनिधी श्री देविदास खेडकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
शाळेतून भाजे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखी नेण्यात आली. भाजे गावात पारंपारिक नऊवारी साड्या परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी हरिनामाच्या गजराचा ठेका धरीत सुंदर नृत्य सादर केले. प्राचार्य श्री.संतोष पवार यांच्या शुभहस्ते विठ्ठल-रुक्मिणी ची आरती करण्यात आली. पर्यवेक्षक श्री.मकरंद गुर्जर, परमेश्वर खाटपे व मुकुंद भोसले यांनी पांडुरंगाष्टकम् चे पठण केले. विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करुन पालखी सोहळ्याची सांगता झाली.
छोट्या मुलांची वृक्षदिंडी व विविध घोषवाक्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कलाशिक्षक श्री.धुळाजी देवकाते व श्री.विजय कवडे यांनी पालखी सजावट व सुशोभन सुंदररित्या केले.
पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख रोहिदास डिकोळे, मुकुंद भोसले, कविता गायकवाड, संभाजी तुपे, राजेंद्र होले, प्रशांत घाडगे, सुषमा येवले, सीमा सिंग, सुरेखा अहिरे, शिल्पा आंबेकर, अनुजा वाघमारे, ललिता पवार, मनोहर भोसले, गणेश गायकवाड, बाळू शिरसाट, बाळासाहेब कोकणे, दिपाली खैरे, मनीषा जगताप, श्रीराम तांदळे, दिपाली गायकवाड, जालिंदर बनकर, शामल तिकोणे , अंजली आंबेकर, कविता पोटे, पवन घोरपडे व सर्व सेवक सेविका यांनी परिश्रम घेतले. शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभले.